23 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) 2022 च्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत आहे.
कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये 31 व्यवसाय अभ्यासक्रमांच्या 1300 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 23 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील प्रवेश प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी केले.
प्रवेशाचे नवीन वेळापत्रक
17 जून ते 23 जुलै ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे.
22 जून ते 23 जुलै प्रवेश अर्ज निश्चिती.23 जून ते 24 जुलै पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे.
25 जुलै तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर.
25 ते 26 जुलै गुणवत्ता यादीबाबत तक्रारी नोंदविणे.
28 जुलै अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर.
30 जुलै ते 3 ऑगस्ट पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
6 ऑगस्ट दुसऱया प्रवेश फेरीसाठी निवडयादी प्रसिध्द.
8 ते 12 ऑगस्ट दुसऱया प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन विकल्प निवडून प्रवेश निश्चिती.
16 ऑगस्ट तिसऱया प्रवेश फेरीसाठा निवड यादी प्रसिध्द.
17 जुलै ते 20 ऑगस्ट तिसऱया प्रवेश फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश.
17 जुलै ते 20 ऑगस्ट चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन विकल्प सादर करणे.
23 ऑगस्ट चौथ्या फेरीतील निवड यादी जाहीर होणे.
24 ते 27 ऑगस्ट चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेणे
1 ते 27 ऑगस्ट नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व निश्चित करणे.
29 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता समुपदेशन फेरी
30 जुलै ते 31 ऑगस्ट खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश