ऑनलाईन टीम/तरुण भारत
Jacqueline Fernandez granted interim bail : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernande) २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंडरिंगप्रकरणात (Money Laundering Case) आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) मनी लॉंडरिंगप्रकरणात ईडीच्या चौकशी दरम्यान सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला ५.७१ कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले होते. ईडीने १७ ऑगस्ट रोजी जॅकलीनवर आरोपपत्र दाखल केले होते.त्यामध्ये तिला आरोपी म्हंटले होते. दरम्यान, आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.
दरम्यान, ईडीच्या चौकशीनंतर जॅकलिनचा सुकेशच्या केसमध्ये संबंध असल्याचं समोर आल्यानंतर अभिनेत्री पटियाला कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं. जॅकलिननं पटिया हाऊस कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीनंतर कोर्टानं अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.