Tarun Bharat

जॅकलीन फर्नांडिसची हॉलिवूडवारी

Advertisements

चित्रपटाचे पोस्टर केले शेअर

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलिवूडचा मार्ग पकडला आहे. आता या मार्गावर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने पाऊल ठेवले आहे. जॅकलीन आता ‘टेल इट लाइक ए वुमन’ या हॉलिवूडपटातून झळकणार आहे. जॅकलीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

हा चित्रपट तब्बल 8 महिलांकडून दिग्दर्शित करण्यात येत आहे. ‘टेल इट लाइक अ वुमन’च्या पूर्ण टीमसोबत या असाधारण प्रयत्नाचा हिस्सा होण्याचा मला गर्व वाटतोय. या विशेष प्रवासात सामील करण्यासाठी लीना यादव यांचे आभार. त्यांनीच माझ्या व्यक्तिरेखेचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आता मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नसल्याचे जॅकलीनने म्हटले आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवर जॅकलीनसोबत मार्गेरिटा बाय, ईवा लोंगोरिया, कारा डेलेविंगने, ऐनी वतनबे, जेनिफर हडसन आणि मार्सिया गे हार्डन दिसून येत आहेत. या अँथोलॉजीमध्ये वेगवेगळय़ा धाटणीच्या अनेक कथा असतील. चित्रपटाच्या ज्या भागात जॅकलीन काम करतेय, त्याचे नाव ‘शेअरिंग ए राइड’ आहे. जॅकलीन यापूर्वी ‘बच्चन पांडे’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसून आली होती. तर लवकरच ती ‘सर्कस’, ‘रामसेतू’ या चित्रपटांमधून झळकणार आहे.

Related Stories

वीर दास यांचा शो रद्द करण्याची हिंदूत्ववादी संघटनांची मागणी

Abhijeet Khandekar

अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या

Tousif Mujawar

Kantara : कंतारा स्टार ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन

Abhijeet Khandekar

शाळेच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा बॅक टू स्कूल

Patil_p

हिरो गायब मोड ऑन मालिकेत धक्कादायक वळण

Patil_p

टिस्का चोप्रा मदतीसाठी सरसावली

Patil_p
error: Content is protected !!