वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमधील राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. जगदानंद सिंह हे स्वतःचे पुत्र आणि माजी कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याकडे जगदानंद सिंह राजीनामा सोपविणार आहेत. शुक्रवारी दुपारी ते दिल्लीत लालूप्रसादांची भेट घेणार आहेत. अलिकडेच सुधाकर यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजीमुळे त्यांना हा राजीनामा द्यावा लागल्याचे मानले जात आहे.