Tarun Bharat

Vice President Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. एनडीएकडून जगदीप धनखड तर युपीएकडू मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर जगदीप धनखड यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत नवे उपराष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळविला आहे. (Jagdeep Dhankhar is new vice president of India)

धनकड यांना ५२८, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली. त्याचवेळी १५ मते रद्द करण्यात आली. जगदीप धनकड हे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे आणि नवीन उपराष्ट्रपती ११ ऑगस्ट रोजी शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८० पैकी ७२५ खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या ७८८ आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७८०खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून आजच निकालही जाहीर झाला आहे.

धनकड १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. १९९१ मध्ये धनकड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी १९९३ मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर २००३ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखर यांची जुलै २०१९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

Related Stories

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची घेतली भेट

Abhijeet Shinde

नौदलाच्या कमांडरांची परिषद सुरू

Patil_p

अकरावी फेरीही तोडग्याविना

Patil_p

लोकसभेतील काँग्रेसचे चार खासदार निलंबित

Patil_p

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर 

prashant_c

आयआयएससी बेंगळूर देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

Amit Kulkarni
error: Content is protected !!