Tarun Bharat

हिवाळ्यात अक्रोड आणि गुळ खाण्याचे जाणून घ्या फायदे

Health Care Tips : हिवाळ्यात अक्रोड सोबत गुळ खाल्ल्याने थंडीत होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून आपण वाचू शकतो. याशिवाय अक्रोड आणि गुळ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड,लोह,फॉस्फरस,तांबे,प्रथिने,कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी पोषक तत्वे असतात. तर गुळात प्रोटीन,व्हिटॅमिन बी १२,व्हिटॅमिन बी ६,फॉलेट,कॅल्शिअम,लोह,फॉस्फरस आणि सेलेनिअम सारखी पोषक तत्वे असतात. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात लहान मुले आणि वृध्द जादा प्रमाणात आजारी पडत असतात त्यामुळे त्यांना या दिवसात अक्रोड आणि बदाम खाण्यास दिले पाहिजे.आज आम्ही तुम्हाला अक्रोडासोबत गुळाचे सेवन केल्यास आरोग्याला कोणते फायदे होतात याविषयी सांगणार आहोत.

अक्रोड सोबत गुळाचे सेवन केल्याने असे फायदे होतात
अक्रोड सोबत गुळ खाल्ल्याने हाय बीपीची समस्या टाळता येते. हे मिश्रण बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
जर तुम्ही अक्रोड सोबत गुळ खाल्ला तर शरीराला योग्य ऊर्जा देखील देऊ शकता. थकवा जाणवणार नाही.फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळेल. यासोबतच आळसही दूर होतो.
जर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल किंवा लालसरपणा आणि पुरळ उठत असतील तर तुम्ही अक्रोड खाऊन या समस्येवर मात करू शकता. अक्रोड आणि गुळात अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवतात. यासोबतच त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
अक्रोड आणि गुळाचे सेवन कसे करावे
उकळलेल्या पाण्यात अक्रोड आणि गूळ पावडर टाकून मिश्रण शिजवून घेवून ते तुम्ही खाऊ शकता. सकाळ संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. असे केल्याने घशाच्या समस्येपासून आराम मिळतो.

Related Stories

महिनाभर टिकेल अशी कुरकुरीत लसूण शेव, जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

हंडी बिर्याणी

Omkar B

चॉकलेट चिप कुकीज

Omkar B

डेंटल कॅपच्या अंतरगात….

Omkar B

राष्ट्रीय आयुष संस्थांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Abhijeet Khandekar

समोसा सँडविच

tarunbharat