गेल्या पाच दिवसांपासून बंद असणाऱ्या गुळ सौद्याला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवात झाली आहे.प्रशासक आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रतिक्विंटल 100 ते 150 रुपये ज्यादा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळाला आहे. सरासरी तीन हजार, पाचशे ते तीन हजार सातशे रुपये दर मिळाल्याने गूळ उत्पादक समाधानी झाले आहेत.
गुळाला दर मिळत नसल्याने गुळ उत्पादक शेतकरी संतप्त झाले होते. गुळाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे सुरू करू देणार नाही, अशी गुळ उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका घेतली होती. कर्नाटकचा गुळ कोल्हापुरी म्हणून विकला जातोय. हा प्रकार रोखवा, अशी मागणीही गुळ उत्पादकांनी केली होती. यापुढे कर्नाटकी गुळाला कोल्हापुरी लेबल लागल्यास फौजदारी होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


previous post