ऑनलाईन टीम / तरुण भारत :
naxalite arrested from Nalasopara, mumbai मुंबईच्या नालासोपारा परिसरातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील धानवीत एका चाळीत आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. या नक्षलवाद्यावर सरकारने 15 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.
हुलाश यादव (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो मूळचा झारखंडच्या डोडगा येथील आहे. सन 2004 पासून तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटीचा सदस्य देखील आहे. त्याच्यावर सरकारने 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते.
अधिक वाचा : पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
हा नक्षलवादी आज पहाटे नालासोपाराच्या रामनगर येथील धानवीत एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. एटीएसकडून त्याची चौकशी सुरू आहे.