चकमकीत एक जवान अन् 2 नागरिक जखमी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ात सोमवारी रात्री उशिरा बटपोरा भागात सुरक्षा दल अन् दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याला कंठस्नान घातले आहे. चकमकीत एक सैनिक तसेच 2 नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले हेते.