Tarun Bharat

‘जैश’च्या दहशतवाद्याला उत्तर प्रदेशमधून अटक

Advertisements

नुपूर शर्मा होत्या टार्गेटवर ः आत्मघाती हल्ल्याच्या पवित्र्यात असताना कारवाई

लखनौ / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून शुक्रवारी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी (टीटीपी) संबंधित संशयित दहशतवादी मोहम्मद नदीम याला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या एटीएसने ही कारवाई केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान ‘जैश’च्या वतीने आपल्यावर भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांना ठार करण्याचे काम देण्यात आल्याची कबुली  दहशतवादी नदीमने दिली आहे.

सहारनपूर जिल्हय़ातील कुंडकलन, गंगोह पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एक युवक जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानस्थित ‘टीटीपी’च्या विचारसरणीने प्रभावित झाल्याची माहिती एटीएसला गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. तसेच सदर युवक आत्मघाती हल्ल्यासाठी सज्ज होत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार एटीएसच्या पथकाने संबंधित संशयित युवकाला पकडण्यात यश मिळविले आहे. चौकशीनंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातही दहशतवादी कृत्यांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचा दावा तपास अधिकाऱयांकडून करण्यात आला आहे.  पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील जेईएम आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांशी चॅट करण्याशिवाय त्याच्या फोनमधून व्हॉईस मेसेजही मिळाले आहेत. नदीमच्या अटकेमुळे तपास यंत्रणांना मोठे यश मिळाल्याचेही सांगण्यात आले.

प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाण्याचा इरादा

एटीएसने नदीम आणि त्याचा भाऊ तैमूरला ताब्यात घेतले आहे. तैमूरही सध्या एटीएसच्या ताब्यात आहे. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नातलगांच्या नावाखाली दोघांनाही पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी जायचे होते. नदीमला पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतकरी आहे. नदीम हा मूळचा सरसावा येथील ढिक्काकला गावचा रहिवासी आहे.

आत्मघाती हल्ल्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

दहशतवादी मोहम्मद नदीम हा आत्मघाती हल्ल्याच्या तयारीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या सैफुल्ला (पाकिस्तानी) कडून प्रशिक्षण घेत होता, असे उत्तर प्रदेश एटीएसच्या एका अधिकाऱयाने सांगितले. सरकारी इमारतीवर किंवा पोलीस संकुलावर आत्मघाती हल्ला करण्याची त्याची योजना होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी विशेष प्रशिक्षणासाठी नदीमला पाकिस्तानात बोलावले होते. इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचाही तो विचार करत होता, असेही सध्या उघड झाले आहे.

Related Stories

पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना

Patil_p

काँग्रेस सदस्य नाही, अशी पहिलीच वेळ

Patil_p

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल पक्षातून निलंबित

Abhijeet Shinde

देशव्यापी टाळेबंदीमुळे 5 टक्के ट्रकच रस्त्यांवर

Patil_p

भविष्यात ‘एआय’ शिक्षक देणार गुण

Patil_p

ब्लॅक फंगससाठी झिंकयुक्त द्रव्यांचा अतिरेक कारणीभूत ?

Patil_p
error: Content is protected !!