Tarun Bharat

न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार जयशंकर

Advertisements

नवी दिल्ली : विदेशमंत्री एस. जयशंकर हे 5-11 ऑक्टोबर या कालावधीत न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहेत. विदेश मंत्री म्हणून जयशंकर यांचा पहिला न्यूझीलंड दौरा असणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी जयशंकर हे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. न्यूझीलंडच्या जडणघडणीत अभूतपूर्व योगदान देणाऱया भारतीय समुदायाच्या लोकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या विदेशमंत्री नानया महुता यांच्यासोबत जयशंकर हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. न्युझीलंडच्या मंत्री प्रियंका राधाकृष्णन यांच्यासह  अनेक मंत्री, खासदार, उद्योजक तसेच भारतीय समुदायाच्या लोकांना जयशंकर भेटणार आहेत.

Related Stories

राजस्थानात रुग्ण महिलेवर बलात्कार

Patil_p

सुनेमुळे संताप, पोलिसांवर गोळीबार

Patil_p

मृत सैनिकांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचे चीनचे प्रयत्न

Patil_p

कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षात जावे : रजनीकांत

Patil_p

भारत-अमेरिका करणार एकत्र नौदल सराव

Patil_p

विदेशात कोव्हॅक्सिन उत्पादनासाठी प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!