Tarun Bharat

अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा

Advertisements

वृत्तसंस्था /नोम पेन्ह

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथे अमेरिकेचे विदेशमंत्री अँटनी ब्लिंके यांच्याशी चर्चा केली आहे. हे दोन्ही नेते आसियान परिषदेसाठी नोम पेन्हच्या दौऱयावर आहेत. श्रीलंकेतील स्थिती, म्यानमारमधील घडामोडी आणि अन्य जागतिक आव्हानांवर दोन्ही विदेशमंत्र्यांनी चर्चा केली आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱयानंतर चीन-तैवानमधील वाढत्या तणावावरही दोन्ही विदेशमंत्र्यांनी चर्चा केली असल्याचे मानले जात आहे. नोम पेन्हमध्ये आसियान मंत्रिस्तरीय परिषदेच्या व्यतिरिक्त अमेरिकेचे विदेशमंत्री ब्लिंकेन यांच्यासोबत भारत-अमेरिका संबंध आणि जागतिक स्थितीवर चर्चा केली असल्याचे जयशंकर यांनी ट्विट करत सांगितले आहे.

अमेरिका आणि भारत हे हिंद-प्रशांत क्षेत्रात आसियानच्या केंद्रीय भूमिकेचे प्रबळ समर्थक आहेत. आमच्याकडे एक स्वतंत्र तसेच मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी एक संयुक्त दृष्टीकोन असून ज्यावर आम्ही प्रत्येकदिनी वेगवेगळय़ा पद्धतींनी काम करत असतो. निश्चितपणे आमच्यासमोर काही आव्हाने असून याबद्दल दोन्ही देशांना चिंता वाटत आहे. यात श्रीलंका तसेच म्यानमारमधील स्थिती आणि अनेक अन्य आव्हाने सामील असल्याचे ब्लिंकेन यांनी चर्चेदरम्यान म्हटले आहे.

Related Stories

माणुसकी व्यक्त करणारे छायाचित्र

Patil_p

ऑनलाइन क्लासदरम्यान मोबाईलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

Patil_p

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण अमेरिकेकडून रद्द

Patil_p

भारताने चिनी नागरिकांसाठीचा टूरिस्ट व्हिसा केला निलंबित

Abhijeet Shinde

सर्वात मोठे गाल असणारी महिला

Patil_p

महामारीतही न घाबरता प्रवास करा!

Patil_p
error: Content is protected !!