शिरोळ प्रतिनिधी
पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सक्त मजुरीची व 26 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी ठोठावली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगर मधील आरोपी बशीर दिलावर शेख याने पीडित मुलीच्या विरोध असताना लैंगिक अत्याचार केला. सदर मुलीच्या आईने शिरोळ पोलिसात याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली होती. तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दोषारोप दाखल केले होत. या काम सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. या कामे सरकारी वकील उदय कुलकर्णी यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा निवाड्याचा दाखला देत बाजू मांडली व आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने साक्षी पुरावा ग्राह्य धरून दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 26 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या तपास कामी पोलिस अंमलदार संदीप हेगडे यांचे मौलिक सहकार्य लाभले.