ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांचा जळगाव दौरा रद्द झाला आहे.
जळगावात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्यावतीने महाकुंभांचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड शासकीय विमानातून जळगावच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि रस्ते मार्गाने मुंबई ते जळगाव अंतर जास्त असल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
अधिक वाचा : बुलढाण्यात काँग्रेसला खिंडार; 8 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, हा दौरा रद्द झाल्यानंतर मुंबई विमानतळावरून मुख्यमंत्री शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेने तर उपमुख्यमंत्री फडणवीस सागर या निवासस्थानी रवाना झाले.