Tarun Bharat

Income Tax Raid : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३९० कोटींची मालमत्ता जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जालन्यात आयकर विभागाकडून (Jalna Income Tax Raid) आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर हे छापे टाकायला सुरुवात झाली होती. आज एका स्टील व्यावसायिकावर छापा टाकून ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम यावेळी आयकर विभागानं जप्त केली आहे. तर याचवेळी ३२ किलो सोन्यासह ३९० कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. असं असलं तरी ज्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नावं समोर आलेली नाही. यावेळी छापेमारी करताना १०० अधिकारी होते. यावेळी रक्कम मोजण्यासाठी १४ तास लागल्याची माहिती आहे. ही मराठवाड्यातील मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, आयकर विभागले स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर आज केलेल्या छापेमारीत तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास १४ तास रोख रक्कम मोजत होते.

हे ही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

जालनासारख्या तुलनेने लहान जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे इतक्या मोठ्याप्रमाणात बेहिशेबी संपत्ती सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याप्रमाणे औरंगाबादमधील व्यावसायिकांवरही अशाचप्रकारे छापे पडल्याची माहिती आहे. त्याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु, जालन्यातील आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या संपत्तीचे आकडे हे चक्रावणारे आहेत. जालन्यातील स्टील व्यावसायिकांकडे रोकडे आणि सोन्याबरोबरच हिरे, मोती असा ऐवजही आढळून आला. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले.

Related Stories

‘पन्हाळा पुरवठा’ मध्ये भ्रष्टाचाराचे ‘सॅनिटायझेशन’

Abhijeet Shinde

वारणा कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय कोरे यांची निवड

Sumit Tambekar

गणेशोत्सवात पावसाचे तांडव

Patil_p

रामतीर्थजवळ सापडली मानवी कवटी; डीएनए चाचणी होणार

Abhijeet Shinde

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल

datta jadhav
error: Content is protected !!