ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे (Hij तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये संघटनेतील सर्वात जुना सक्रीय दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक, विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेक्याचे नाव अश्रफ मोलवी असे आहे.
पीटीआयच्या एका अहवालात म्हटले आहे की अनंतनाग जिल्ह्यातील वार्षिक अमरनाथ यात्रेच्या मार्गाजवळ ही चकमक झाली असून सुरक्षा दलाचे हे एक ऑपरेशन मोठे यश मानत आहेत. पोलिसांनी सांगितले की, पहलगाम, अनंतनाग येथील श्रीचंद टॉप जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. प्रत्युत्तरादाखल तीन दहशतवादी मारले गेले, असेही अधिकाऱ्याने सांगितले.