ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच आहेत. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केला आहे. दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) महिला शिक्षिकेवर शाळेत घुसून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या गोळीबारात महिला शिक्षिका (Teacher) गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
कुलगामच्या गोपालपुरा (Gopal Pura of Kul gam) येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी कश्मीरी पोलिसांकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच, सुरक्षा दलाकडून (Security forces) संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. मात्र, या गोळीबारानंतर पुन्हा कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांकडून (Terrorists) टार्गेट केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
काश्मीर पोलिसांचे ट्विट
कुलगामच्या गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडित महिला शिक्षकावर गोळीबार केल्याचे ट्विट काश्मीर पोलिसांनी केले आहे. रजनीबल असे या शिक्षिकेचे नाव आहे. ती सांबा येथील रहिवासी असून तिच्या पतीचे नाव राजकुमार आहे. यावेळी ती कुलगाममधील चावलगाममध्ये राहत असून तिची ड्युटी गोपालपुरा येथे सुरू होती. या प्राणघातक गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.