जामताडा हा शब्द दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. जामचा अर्थ साप तर ताडचा अर्थ घर असा होतो. झारखंडमधील जामताडा तसेही सापांमुळे प्रसिद्ध होता, परंतु मागील काही काळात हा जिल्हा वेगळय़ाच कारणासाठी देशभरात ओळखला जात आहे. या जिल्हय़ाला आता सायबर क्राइमचा माफिया म्हटले जात आहे. गुन्हय़ांचे प्रमाण वाढल्याने 22 राज्यांच्या पोलिसांना येथे हस्तक्षेप करावा लागला होता. बेरोजगारी आणि गरीबीने येथील तरुणाईला गुन्हेगारीच्या दरीत लोटले होते.
नेटफ्लिक्सने या जिल्हय़ातील घटनांवर ‘जामताडा’ नावाने वेबसीरिज तयार केली होती. या सीरिजमध्ये कुठलाच गाजलेला कलाकार नव्हती, परंतु कहाणी अन् अभिनय दमदार असल्याने ही सीरिज मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय ठरली होती. आता निर्मात्यांनी ‘जामताडा’च्या दुसऱया सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
जामताडा 2 पुन्हा एकदा सायबर क्राइम आणि फिशिंगशी निगडित कहाणी दर्शविणार आहे. यात अमित स्याल, सीमा पहवा, रवि चहल आणि मोनिका पवार यासारखे कलाकार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शन सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. तर तृषांत श्रीवास्तव यांनी याची कथा लिहिली आहे. 23 सप्टेंबर रोजी जामताडाचा हा दुसरा भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.