काकतीत हजारो भाविकांच्या साक्षीने इंगळ्यांचा सोहळा उत्साहात
वार्ताहर /काकती
य् ाsथील जागृत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या इंगळ्यांचा सोहळा मंगळवार दि. 28 रोजी हजारो भाविकांच्या साक्षीने उत्साहात पार पडला. यावेळी दर्शनासाठी जनसागर लोटला होता. सोमवार दि. 27 रोजी सिद्धेश्वर मंदिर येथून सायंकाळी पालखीचे आगमन श्री रूद्रपाक देवस्थानात झाले. हिरेमठ स्वामींच्या सानिध्यात हक्कदार, मानकरी, देवस्की पंच, देवस्थान पंच मंडळाच्या उपस्थितीत देवाची पूजा करण्यात आली. तेथून पालखीचा मंदिरात प्रवेश झाला.
आंबिल गाड्यांचा मान-औक्षण
सोमवारी सायंकाळी आंबिल गाड्यांची पंचारती केली. सवाद्य मिरवणुकीने मानाचे तिन्ही गाडे वतनदारांचे असून त्यांना प्रथम मान देण्याची परंपरा आहे. त्यानंतर गवी, सोमाई, टुमरी, बडगुळी, कोचेरी असे हक्काचे गाडे सहभागी झाले होते. सोमवारी रात्री मिरवणूक भावकाई गल्ली, कुरबर गल्ली, होळी गल्ली, माऊती गल्ली व मुत्तेनट्टी आदी शोभा गाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून मंगळवारी सकाळी शोभा गाड्यांची सांगता झाली.
इंगळ्यांचा धार्मिक सोहळा
मंगळवारी सायंकाळी देवस्थानचे प्रमुख हिरेमठ स्वामींचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. पंच, हक्कदार, मानकरी यांच्या उपस्थितीत त्यांची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. इंगळ्यांच्या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अग्निकुंडाचे विधिवत पूजन, कालघटकेनुसार प्रदक्षिणा होताच जयघोषात इंगळ्यातून भाविक धावले.