नव्या शैलीत दिसणार नुसरत भरुचा
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा छोरी या चित्रपटाच्या यशानंतर आणखीन एका महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशासह मोठय़ा पडद्यावर परतत आहे. तिचा आगामी चित्रपट ‘जनहित में जारी’ 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नुसरतने स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटद्वारे एक नवी पोस्ट शेअर केली असून यात ती अनोख्या लुकमध्ये दिसून येत आहे.


‘उंगलियां नहीं अपनी सोच उपर करो…ये सूचना है.. जनहित में जारी’ असे तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये स्वतःचा नवा लुक शेअर करत नमूद केले आहे. यापूर्वी नुसरतने चित्रपटातील स्वतःचा पहिला लुक शेअर करत सर्वांना चकित केले होते. चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये ती एक विशेष संदेश असलेल्या टी-शर्टमध्ये दिसून आली होती.
जनहित में जारी हा चित्रपट प्रासंगिक आणि विनोदी धाटणीचा चित्रपट आहे. नुसरतसोबत या चित्रपटात अन्नू कपूर, अनुद सिंह ढाका आणि पारितोष त्रिपाठी यासारखे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय बसंतू सिंह यांनी केले आहे. याचबरोबर नुसरत लवकरच ‘सेल्फी’ आणि ‘रामसेतू’ या चित्रपटांमध्येही दिसून येणार आहे.