Tarun Bharat

जान्हवीने खरेदी केले नवे घर

65 कोटी रुपयांचा डुप्लेक्स 8,669 चौरस फूट आकार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अलिकडेच मुंबईतील बांद्रा भागात एक डुप्लेक्स खरेदी केला असून याची किंमत 65 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बंगला जान्हवीने 12 ऑक्टोबर रोजी खरेदी केला होता, याकरता तिने 3.90 कोटी रुपयांचे मुद्रांक तसेच नोंदणी शुल्क भरल्याचे समजते.

जान्हवीचा हा डुप्लेक्स 8,669 चौरस फुट आकाराचा आहे. यात घरासह एक प्रायव्हेट गार्डन, स्वीमिंग पूल आणि 5 वाहनांसाठी पार्किंग एरिया आहे. जान्हवीने यापूर्वी जुलै महिन्यात स्वतःचे जुने घर विकले होते. हे घर 3456 चौरस फूट आकाराचे होते. तिने ते घर डिसेंबर 2020 मध्ये 39 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. हे घर जान्हवीकडून राजकुमार रावने 44 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

जान्हवीने दिग्दर्शक शशांक खेतानचा चित्रपट ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये कारकीर्दीस प्रारंभ केला होता. हा चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट चालू आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे. तर जान्हवी आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘बवाल’, ‘तख्त’, ‘दोस्ताना 2’ आणि ‘किट्टी’मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

Related Stories

अवरोध 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

शहरी- ग्रामीण जीवनाचे वास्तव मेरे देश की धरती

Patil_p

‘ब्लॅक पँथर 2’चा ट्रेलर सादर

Patil_p

4 फेब्रुवारीला झळकणार शाबाश मिथु

Patil_p

लाइगर’चे चित्रिकरण सुरू

Patil_p

मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये संग्रहीत होणारा ‘फत्तेशिकस्त’ पहिला चित्रपट

tarunbharat