भूषण कुमारचा बिग बजेट चित्रपट
भूषण कुमार आणि पंकज पराशर यांनी मागील वर्षी ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी जान्हवी कपूरशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. निर्मात्यांनी यापूर्वी श्रद्धा कपूरची यासाठी निवड केली होती, परंतु तिच्याकडे चित्रिकरणासाठी तारखा नसल्याने हा विचार सोडून द्यावा लागला होता.
जान्हवी कपूरने यापूर्वी स्वतःची आई म्हणजेच श्रीदेवी यांच्या कुठल्याही चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले होते. याचमुळे भूषण कुमार यांच्या ऑफरवर जान्हवी कोणता निर्णय घेते हे पहावे लागणार आहे. जान्हवीने यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपति आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जान्हवी सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’ची तयारी करत आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसून येणार आहे. जान्हवीसोबत या चित्रपटात राजकुमार राव झळकणरा आहे. याचबरोबर नितेश यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया चित्रपटात जान्हवी हे वरुण धवनसोबत काम करत आहे.