शिखर पहारियाला डेट करत असल्याची चर्चा
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दिवाळीनिमित्त अनेक पाटर्य़ांचे आयोजन केले आहेत. अशाच एका पार्टीमध्ये जान्हवी कपूरला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत पाहून अनेक जण चकित झाले. जान्हवी कपूर ही निर्माता अमृत पाल बिंद्रा यांच्या पार्टीत स्वतःचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत पोहोचली. जान्हवी आणि शिखर परिहारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जान्हवी आणि शिखरने काही काळापूर्वी परस्परांना डेट केले होते. शिखर पहारिया हा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा नातू असल्याचे समजते. जान्हवी आणि शिखर यांना पुन्हा एकत्र पाहिल्यावर ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जान्हवी कपूर लवकरच ‘मिली’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात जान्हवी पहिल्यांदाच पिता बोनी कपूरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मिली या चित्रपटासह जान्हवी कपूर ही वरुण धवन याच्यासोबत ‘बवाल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटात ती राजकुमार रावसोबत काम करत आहे.