Tarun Bharat

जान्हवी कपूर करणार टॉलिवूडमध्ये पदार्पण

राम चरणसोबत करणार चित्रपट

बॉलिवूडमध्ये स्वतःचा जम बसविण्यासाठी जान्हवी कपूर जोरदार मेहनत करत आहे. अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवणार आहे. बुच्ची बाबू यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया चित्रपटातून जान्हवी तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिग्गज कलाकार राम चरण असणार आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. बुच्ची बाबू यांनी यापूर्वी ‘उप्पेना’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती लाभली होती. तर नव्या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. जान्हवी अन् राम चरण ही नवी जोडी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘आरआरआर’च्या यशानंतर राम चरणच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून देशभरात त्याचे चाहते निर्माण झाले आहेत.

जान्हवी कपूरची आई श्रीदेवीने चिरंजीवी यांच्यासोबत एका चित्रपटात काम केले होते. राम चरण हा चिरंजीवी यांचा पुत्र आहे. याचमुळे राम चरण अन् जान्हवी यांच्या जोडीला मोठय़ा पडद्यावर पाहण्याची उत्सुकता दोघांच्या चाहत्यांमध्ये आहे.

Related Stories

कोरोनामुळे वाढले होते वजन : मलायका

Amit Kulkarni

बॉलिवूडसाठी इच्छुक मनी हाइस्टची ‘टोक्यो’

Patil_p

‘थार’ चित्रपट 6 मेला होणार प्रदर्शित

Patil_p

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नागालँडची एंड्रिया

Amit Kulkarni

फूड डोनेशन मोहिमेत मृणालचा सहभाग

Amit Kulkarni

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

Archana Banage