अभिनेत्री जान्हवी कपूरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. जान्हवीचा आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’ थेट ओटीटी प्लॅटफॉर्मर प्रदर्शित केला जाणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने शुक्रवारी यासंबंधी घोषणा केली आहे. जान्हवीने याची माहिती चित्रपटाचे दोन पोस्टर्स शेअर करत दिली आहे. जान्हवीने स्वतःच्या चाहत्यांकडून चित्रपटासाठी ‘गुड लक’ मागितले आहे. “एका नव्या ऍडव्हेंचरवर निघाली आहे, गुड लक म्हणणार नाही का? गुड लक जेरी 29 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे’’ असे जान्हवीने म्हटले आहे.
सिद्धार्थ सेन यांच्याकडून दिग्दर्शित गुड लक जेरी हा थ्रिलर धाटणीचा चित्रपट आहे. आनंद एल. राय याचे सह-निर्माते आहेत. जान्हवीने या चित्रपटाचे चित्रिकरण मार्च महिन्यात पूर्ण केले हेते. चित्रपटात दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
जान्हवीचा गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांसमोर आला होता. जान्हवी पुढील काळात मिली, मिस्टर अँड मिसेस माही आणि बवाल या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.