Tarun Bharat

जपान हादरलं ! माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

नारा (Nara) शहरात भाषण करत असताना काल भरसभेत शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर काही तासातचं उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अबे यांच्या हत्येमुळे जगभरात खळबळ माजली आहे. शिंजो अबे (Shinzo Abe) यांच्या निधनाने एक सच्चा मित्र भारताने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. आबे यांच्या निधनांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत त्य़ांना धक्का बसल्याचे सांगितले आहे. (Japan PM Shinzo Abe passes away)

नरेंद्र मोदी यांचे ट्विट
शिंजो आबे, हे माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने मला अतीव दुःख झालं, असून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आबे हे एक जागतिक नेते होते आणि उत्तम प्रशासक होते. त्यांनी त्यांचं आयुष्य जपान आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केलं होतं, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

हेही वाचा- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर


शिंजो आबे यांची कारकीर्द आणि भारताशी असलेले संबंध

१)२०१२ ते २०२० या काळात जपानचे पंतप्रधान, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी अध्यक्ष.

२)भारत-जपान मजबूत करण्यात शिंजो यांचा मोठा वाटा होता.

३)२०२२ मध्ये शिंजो आबे यांचा पद्मविभूषण या भारतीय नागरी पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

४)भारत-जपानमध्ये वैश्विक भागीदारी प्रक्रियेला शिंजो आबे पंतप्रधान झाल्यानंतर गती आली.

५) शिंजो आबे यांनी इंडो-पॅसिफिक फ्रंट उभा करत भारताशी मैत्रीचा नवा अध्याय सुरु केला.

Related Stories

अफगाणिस्तान : मशिदीवरील आत्मघातकी हल्ल्यात 46 ठार

datta jadhav

एप्रिलपासून अंतराळ पर्यटनास प्रारंभ

Patil_p

काँग्रेसमधील वातावरण असंतुष्ट, राजीनामा देण्याचीही अनेकांची तयारी

datta jadhav

आता ‘या’ राज्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यु

Tousif Mujawar

चिंताजनक : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 30 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

खाद्यतेलासाठी 11,000 कोटीची योजना

Patil_p