Tarun Bharat

जपानचा निशिओका विजेता

Advertisements

वृत्तसंस्था/ सेऊल

एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या कोरिया खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानच्या योशीहितो निशीओकाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना कॅनडाच्या चौथ्या मानांकित शेपोव्हॅलोव्हचा पराभव केला.

रविवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात निशीओकाने शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 7-6(7-5) असा पराभव केला. निशीओकाचे एटीपी टूरवरील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने 2018 साली चीनमध्ये झालेली शेनझेन खुली एटीपी टेनिस स्पर्धा जिंकली होती. सेऊल स्पर्धेत निशीओकाने नॉर्वेच्या द्वितीय मानांकित कास्पर रुडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या जेतेपदामुळे निशीओका आता एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत 41 व्या स्थानावर झेप घेईल. या स्पर्धेनंतर निशीओका आता या  आठवडय़ाअखेर होणाऱया जपान खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Related Stories

हरमनप्रीत बिग बॅश स्पर्धेतील पहिली भारतीय ‘मालिकावीर’

Patil_p

हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना ऑलिम्पिकचे तिकीट

datta jadhav

आनंदचा कार्लसनविरुद्ध आणखी एक विजय

Patil_p

भारतीय हॉकी संघाला दडपण हाताळण्याची गरज

Patil_p

चेन्नई संघाच्या सराव शिबिरात रैना, जडेजा दाखल

Patil_p

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा द.आफ्रिकेत

Patil_p
error: Content is protected !!