वृत्तसंस्था/पॅरिस
जपानचा पुरूष जिमनॅस्ट शिनोसुकी ओकाने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जिमनॅस्टीक या क्रीडा प्रकारात तिसरे सुवर्णपदक पटकाविले. ओकाने पुरूषांच्या हॉरिझोन्टल बार प्रकारात तिसरे सुवर्णपदक मिळविले.
जपानच्या ओकाने या क्रीडा प्रकारात 14.533 गुण नोंदवित सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेत ओकाने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारातही यापूर्वी सुवर्ण पदके मिळविली आहेत. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 4 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये तीन सुवर्णपदकाचा समावेश आहे. ओकाने पोमेल हॉर्स जिम्नॅस्टिक प्रकारात कास्य पदक मिळविले. कोलंबियाच्या अॅन्जेल बॅरेजसला रौप्य पदक तर चीन तैपेईच्या हुंगला कास्य पदक मिळाले.