महेश भट्ट यांच्या चित्रपटात मिळाली संधी
जास्मीन भसीनने अनेक टीव्ही शोंमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीला ‘बिग बॉस 14’मध्ये देखील पाहिले गेल्यावर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. जास्मीन आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अन् निर्माते महेश भट्ट अन् विक्रम भट्ट यांच्या चित्रपटातून ती पदार्पण करणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष चव्हाण करत असल्याचे समजते. जास्मीनने यापूर्वी पंजाबी चित्रपट ‘हनिमून’मध्ये काम केले आहे. बिग बॉस 14 दरम्यान अली गोनी सोबतच्या तिच्या जोडीला मोठी पसंती मिळाली होती. दोघांनी स्वतःच्या रिलेशनशिपची देखील कबुली दिली आहे. अली गोनी आणि जास्मीन लवकरच विवाह देखील करू शकतात.