Tarun Bharat

जसप्रित बुमराह टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर

Advertisements

भारतीय संघासाठी मोठा धक्का, ‘बॅक स्ट्रेस प्रॅक्चर’मधून सावरण्यासाठी किमान 6 महिन्यांची विश्रांती क्रमप्राप्त, वर्ल्डकपमधून बाहेर फेकला जाणारा जडेजानंतर दुसरा खेळाडू

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह पाठदुखीमुळे आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे. बुमराह बॅक स्ट्रेस प्रॅक्चरमुळे पुढील किमान सहा महिने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआय पदाधिकाऱयाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियन भूमीत खेळवली जाणार आहे.

‘बुमराह आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही, त्याची पाठीची दुखापत बरीच चिघळली आहे. त्याला स्ट्रेस प्रॅक्चर आहे आणि यातून सावरण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो’, असे वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.

बुमराहचा यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया व तिसऱया टी-20 सामन्यात संघात समावेश होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थिरुवनंतपूरम येथील पहिल्या टी-20 सामन्यासाठी तो संघासमवेत नव्हता. 28 वर्षीय बुमराह हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला जाणारा दुसरा वरिष्ठ खेळाडू ठरला. यापूर्वी, फिरकी अष्टपैलू रविंद्र जडेजा विश्वचषक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. जडेजा सध्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यातून सावरत आहे.

भारतीय क्रिकेट संघ मुळातच ‘अनसेटल्ड’ असून त्यात बुमराहच्या गैरहजेरीमुळे कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी आणखी डोकेदुखी वाढली आहे.

‘बुमराह व जडेजा संघात नसणे भारतासाठी मोठा धक्का देणारे आहे. सध्यासारखी परिस्थिती उद्भवू शकेल, याचा आम्ही कदापि विचारही केला नव्हता. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटसाठी आशिया चषक स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली. मात्र, आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी तरी पूर्ण तंदुरुस्त होता का, हा प्रश्न निर्माण झाला आहे’, असे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाला.

‘बुमराहला आशिया चषक स्पर्धेसाठी, विंडीज दौऱयातून तसेच, भारतातील अनेक द्विदेशीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. पण, आता पाठीच्या दुखापतीचे स्वरुप पाहता त्याला यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बराच वेळ द्यावा लागेल. टी-20 विश्वचषक स्पर्धा महत्त्वाची आहे. पण, बुमराह तरुण आहे आणि भारतासाठी गोलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ आहे. त्यामुळे, त्याच्याबद्दल अति धोका पत्करुन चालणार नाही’, याचा या पदाधिकाऱयाने पुढे उल्लेख केला.

शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते, तरीही…

बॅक स्ट्रेस प्रॅक्चरचा त्रास जाणवत असेल तर त्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेण्याची आवश्यकता असत नाही. पण, हा त्रास कमी होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी द्यावा लागतो.

…तरीही चहर किंवा शमीचा मुख्य संघात समावेश नाही?

जसप्रित बुमराह टी-20 वर्ल्डकप संघातून बाहेर फेकला गेला असला तरी दीपक चहर किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाचाही मुख्य संघात समावेश केला जाणार नाही, अस संकेत आहेत. चहर व शमी यांचा बीसीसीआयने या स्पर्धेसाठी राखीव खेळाडूत समावेश केला आहे.

अन् मायकल होल्डिंग यांचा तो अंदाज तंतोतंत खरा ठरला! 

बुमराह रनअप घेतल्यानंतर चेंडू टाकण्याच्या लोडिंग टाईमवेळी स्लिंगिंग ऍक्शनमध्ये येतो आणि यामुळे त्याच्या पाठीवर मोठय़ा प्रमाणात भार पडतो. या लोडिंगमुळे बुमराहला पाठीच्या दुखापतींना सातत्याने सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज विंडीजचे महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी व्यक्त केला होता. तो अंदाज आता खरे होण्यास सुरुवात झाली आहे.

बुमराहच्या वाटय़ाला सामने कमीच, तरीही!

वर्कलोड मॅनेजमेंटच्या माध्यमातून यंदा बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंवर कमी भार राहील, याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला व यात बुमराहचा देखील आवर्जून समावेश होता. मुळात, बुमराहने या वर्षभरात कमीच सामने खेळले. त्याने 2022 मध्ये 5 कसोटी, 5 वनडे व तितक्याच टी-20 सामन्यात सहभाग घेतला. याशिवाय, तितकेच त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल सामने खेळले. मात्र, यानंतरही बॅक स्ट्रेस फॅक्चरचा त्याला फटका बसला आहे.

Related Stories

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p

हेन्स, बाबर आझम मार्चमधील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

आयपीएल लिलावासाठी 1097 खेळाडू उपलब्ध

Patil_p

यजमान इंग्लिंश संघाची सावध सुरुवात

Patil_p

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे

Patil_p

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p
error: Content is protected !!