प्रतिनिधी /मडगाव
जुने-म्हार्दोळ, वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय आणि आनुषांगिक पंचायतन देवतांच्या प्रतिष्ठापनेचा सतरावा वर्धापन उत्सव (जत्रोत्सव) श्री शके 1944 शुभकृत नाम संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष षष्ठी, सप्तमी, अष्टमी, शुक्रवार, शनिवार आणि रविवार दि. 22, 23 व 24 एप्रिल या दिवसांत विविध धार्मिक व भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा होणार आहे.
शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी 7 वा. श्री सातेरी महालसा नारायणी पंचिष्ट देवतांची पूजा व ‘शतकलश पूजन व शतकलशाभिषेक’ व धार्मिक विधी. नवचंडी अनुष्ठान आरंभ, महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान. दुपारी 1 वा. महाप्रसाद. संध्याकाळी 4 ते 6 वा. भजनाचा कार्यक्रम. 6.30 वा. पुराण व पालखी, 7.30 वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी व तीर्थ-प्रसाद व नंतर अल्पोपहार. रात्री 9 वा. श्री दामोदर कला आणि सांस्कृतिक मंडळ, फातोर्डा निर्मित महान ऐतिहासिक दोन अंकी मराठी नाटक ‘नेकजात मराठा’.
शनिवार दि. 23 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत धार्मिक विधी, देवतांची पूजा, पाठवाचन, दुपारी 12 वा. ‘24 तास अखंड नामस्मरण (संकीर्तन)’ आरंभ. दुपारी 12.30 वा. महनैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान. दुपारी 1 वा. महाप्रसाद. सायंकाळी 6.30 वा. पुराण व पालखी. 7.30 वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी व तीर्थ-प्रसाद. नंतर अल्पोपहार.
रविवार दि. 24 रोजी सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत धार्मिक विधी, देवतांची पूजा, सकाळी 10.30 वा. ग्रहयज्ञ, दुपारी 12 वा. हवनद्वारा नवचंडी सांगता, कुमारीपूजन, बलिदान, पूर्णाहुती, ‘24 तास अखंड नामस्मरण (संकीर्तन)’ समाप्ती. दुपारी 12.30 वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान व प्रार्थना. दुपारी 1 वा. महाप्रसाद. संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत भजनाचा कार्यक्रम. सायंकाळी 6.30 वा. पुराण व नंतर पालखी. सायंकाळी 7.30 वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी, तीर्थ-प्रसाद व नंतर अल्पोपहार व रात्री 9 वा. ‘विविधा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
यंदा सतराव्या वर्धापनदिना निमित्त खास ‘शतकलश पूजन व शतकलशाभिषेक’, 24 तास अखंड नामस्मरण (संकीर्तन)’ आणि ‘कुंकुमार्चन सेवा’ आयोजित केली आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद घ्यावा अशी देवस्थान समितीने विनंती केली आहे.