दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल : दररोज होणार श्री सत्यनारायण महापूजा,भजन, नृत्य, गायनसंगीताची पर्वणी
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा 88 वा महान जत्रोत्सव आज दि. 5 रोजीपासून मोठय़ा उत्साहाने सजरा होणार आहे. काल बुधवारी सौ. व श्री. पांडुरंग वराडकर यांच्याहस्ते 30 व्या वर्धापनदिनानिमित्त श्री देव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेची रितसर पूजा करण्यात आली. नंतर देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्याहस्ते विधीवत पूजा करुन सोन्याचा दंड श्री देव बोडगेश्वरचरणी अर्पण करण्यात आला.
आज गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराचा 88 वा महान जत्रोत्सव होणार असून दु. 1 वा. म्हाप्रसाद, सायं. 4 वा. दिंडी, सायं. 6 वा. भजन, रात्री 8.30 वा. ‘मुद्रा’ हा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम सादर होईल. रात्री 12 वा. पारंपरिक पौराणिक दशावतारी नाटक ‘पुनर्जन्म’ सादर होईल.
दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 5 वा. भजन, सायं. 7 वा. ‘नृत्यमार्ग’, रात्री 8 वा. म्हापसा नगरपालिका क्षेत्र मर्यादित एकेरी नृत्य स्पर्धा होईल. स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 3 हजार, द्वितीय रु. 2500, तृतीय रु. 2 हजार, व 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 1 हजारची देण्यात येतील. स्पर्धकांनी सायं. 7.30 वा. उपस्थित राहावे. रात्री 11 वा. श्रींची आरती व प्रार्थना होऊन उत्सवाची सांगता होईल.
रोज होणार श्री सत्यनारायण महापूजा
शनिवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. पिकअप-ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा. बाल भवनच्या मुलांचा गायन, वादन, नृत्याचा रंगारंग कार्यक्रम, रात्री 8.30 वा. सिद्धकला डान्स अकादमी ऍण्ड इव्हेंट्सतर्फे जान्हवी जयेश बोंद्रे प्रस्तुत ‘मनोमय’ सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होईल. रविवार दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 6 वा. ‘स्वराभिषेक’ संगीत कार्यक्रम, रात्री 8 वा. ‘दिव्यशक्ती’ सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम. सोमवार दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. रिक्षा-ड्रायव्हर असोसिएशन (कदंब स्टॅण्ड) म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा.सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 8 वा. ग्रुप डान्स स्पर्धा, स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 6 हजार, द्वितीय बक्षीस रु. 5 हजार, तृतीय रु. 4 हजार, 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 2000 ची देण्यात येतील. स्पर्धकांनी सायं. 7.30 वा. उपस्थित राहावे. तसेच सभ्य पोषाक धारण करणे आवश्यक आहे.
भजन, नृत्य, गायनसंगीताची पर्वणी
मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा. ‘भक्तीभभाव’ हा भजन, भावगीत व संगीताचा कार्यक्रम. रात्री 8 वा. ‘नृत्यताल’ सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा व्हेजिटेबल व्हेंडर्सतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 6 वा. उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम, रात्री 8 वा. जागृत लोकनृत्य आणि फ्युजन नृत्याचा कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी सायं. 6 वा. भजन, रात्री 8 वा. ‘ईश्वरशक्ती’ सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होईल.
भजन, फुगडी स्पर्धा
शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सायं. 5 वा. भजन स्पर्धा, स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 10,000, द्वितीय रु. 8000, तृतीय रु. 6000, 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 4000. शनिवार दि. 14 जानेवारी रोजी सायं. 6 वा. फुगडी स्पर्धा होईल. स्पर्धेचे प्रथम बक्षीस रु. 10,000, द्वितीय रु. 8000, तृतीय रु. 6000, 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 4000 ची देण्यात येतील.
भक्तीगीत, लोकनृत्य, फुगडी
रविवार दि. 14 जानेवारी रोजी सायं. 5 वा. ‘सूर ईश्वर’ हा अभंग, भक्तीगीत, नाटय़ संगीत व भावगीतांचा कार्यक्रम, रात्री 8 वा. लोकनृत्य स्पर्धा/फोक डान्स स्पर्धा, प्रथम बक्षीस रु. 10,000, द्वितीय रु. 8,000, तृतीय रु. 6000/- 2 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु. 4000. भजन, फुगडी व लोकनृत्य स्पर्धेसाठी मंदिर कार्यालयः सागर मांगले-9764243844 यांच्याशी संपर्क साधावा. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.