Tarun Bharat

निकालाआधीच जयश्री जाधवांच्या विजयाचे झळकले पोस्टर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकाल आज लागणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पण निकालाआधीच काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर कोल्हापूर शहरात झळकले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भारतीय जनता पक्षाकडून सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दोन्ही पक्षाकडून विजयासाठी जोरदार ताकद लावण्यात आली होती. पण निकालानंतरच कुणाचं पारडं जड हे निश्चित होणार आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात जयश्री जाधव यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

दरम्यान निकालआधीच जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स हे बावड्यात झळकले आहेत. या पोस्टर्सवर आमदार झाल्याबद्दल जयश्री जाधवांचे अभिनंदन असे या लिहिण्यात आले आहे. त्यामुळे या पोस्टरची चर्चा सार्वञ आहे.

Related Stories

Kolhapur : दोन महिन्यांत शहराचा कायापालट करा

Abhijeet Khandekar

प्रोत्साहन अनुदान आजपासून बँक खात्यामध्ये वर्ग

Archana Banage

रायगड-हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट; बोटीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

Archana Banage

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारूने घेतला १४ जणांचा बळी

Archana Banage

आसाममध्ये ‘दादा’, प. बंगालमध्ये दीदी ?

Amit Kulkarni

मास्क न लावल्यास 100 तर थुंकल्यास 200 रुपये दंड

Archana Banage