जयसिंगपूर / प्रतिनिधी
Jaysingpur Sugarcane Conference : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपूर येथे 21 ऊस परिषद संपन्न होत असून ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातून मोठय़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहतील.असा विश्वास संघटनेच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
गतवेळची एफआरपी प्लस 200 रुपये,काटामारी रोखण्याकरिता ऑनलाईन पध्दतीचा वजनकाटा करावा,आणि यंदा तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपीसह ऊस परिषदेत अधिक रक्कम जाहीर होईल ती मिळावी अशा प्रमुख मागण्या आजच्या ऊस परिषदेत असणार आहेत.सुरुवातीच्या ऊस परिषदेसारख्या यंदाची ऊस परिषद विक्रमी व्हावी.याकरिता गेल्या महिनाभरापासून शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते जनजागृती करीत होते.गाव तिथे सभा,बैठका घेऊन ऊस परिषदेबाबत जनजागृती केली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी गतवर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये,काटामारी रोखण्याकरिता ऑनलाईन पद्धतीचे वजनकाटे,त्यामुळे यंदाची एकरकमी एफआरपी अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या राज्य सरकारकडे गेल्या होत्या त्याला आजचा शेवटचा अल्टिमेट होता. यापैकी किती मागण्या मंजूर झाल्या.झाल्या नसतील तर पुढील दिशा काय असणार.आंदोलन कोणत्या स्वरुपाचे असेल.संघटनेची राजकीय धोरण काय असेल.याबाबतची घोषणा आजच्या विराट ऊस परिषदेत संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी करतील.या प्रमुख तीन मागण्या मान्य न झाल्यास या हंगामात अडथळे निर्माण करून सरकारला जाब विचारू असा इशारा यापूर्वीच दिला होता.त्यामुळे आजच्या ऊसपरिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
वाहतूक मार्ग
जयसिंगपूर येथे स्वाभिमानीच्या ऊसपरिषदेच्या पार्श्वभूमीवर सांगली-कोल्हापूर या प्रमुख महामार्गावर सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने उदगाव मार्गे केपीटी चौंडेश्वरी मार्गे कोल्हापूर किंवा इचलकरंजी, कोल्हापूरहून सांगलीकडे येणारी वाहने तमदलगे बायपास मार्गे अंकली कडे वळविण्यात आली आहेत. वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये याकरता जयसिंगपूर पोलिस ठाण्याने यंत्रणा कार्यरत केली आहे.


previous post
next post