वृत्तसंस्था/ बर्लीन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बर्लीन खुल्या महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत टय़ुनेशियाच्या टॉप सीडेड जेबॉर तसेच ऑस्ट्रेलियाची ऑलिंपिक चॅम्पियन बेलिंडा बेन्सिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात जेबॉरने अमेरिकेच्या 18 वर्षीय कोको गॉफचा 7-6 (7-4), 6-2 तर दुसऱया सामन्यात बेन्सिकने मारिया सॅकेरीचा 6-7 (6-8), 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा सामना 76 मिनिटे चालला होता. सध्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या जेबॉरला या स्पर्धेत टॉप सिंडीग देण्यात आले होते. दरम्यान टॉप सीडेड स्वायटेकने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.