ऑनलाईन टीम / पुणे :
जेईई मेन 2022 च्या एप्रिल सत्रातील परीक्षा पाच दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता 21 एप्रिलपासून ही परीक्षा सुरू होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे.
यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे जेईई मेन परीक्षा 16, 17, 18, 19, 20 21 एप्रिलला होणार होत्या. आता नव्या तारखांनुसार ही परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 01, व 04 मे रोजी होणार आहे. आता जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात मिळतील. परीक्षांसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांची यादी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जारी केली जाईल. विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी जेईई मेनची तारीख बदलण्याचं आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं यानॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हटले आहे.