नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्त्यांनी केली होती. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम राबवली गेली होती.
देशात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.