Tarun Bharat

जेफ बेझोस ‘वॉशिंग्टन पोस्ट’ विकणार नाही

प्रवक्त्यांनी बातम्या फेटाळून लावल्या

वॉशिंग्टन ः ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्ट विकणार नाहीत, असे मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेझोसच्या प्रवक्त्याने सांगितले. पुढे ते म्हणाले की, वॉशिंग्टन पोस्टची विक्री केली जाणार नाही. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस फुटबॉल संघ वॉशिंग्टन कमांडर्स विकत घेण्यासाठी अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्ट विकू शकतात, अशी बातमी यापूर्वी मीडियामध्ये आली होती मात्र त्यामध्ये काही सत्यता नसल्याचे म्हटले जात आहे. 

2013 मध्ये वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले

बेझोस यांनी 2013 मध्ये वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकन 250 दशलक्ष डॉलरला विकत घेतले. न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे की बेझोस त्याचे मालक डॅन स्नायडर यांच्याकडून कमांडर्स खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वॉशिंग्टन कमांडर्सने 1983, 1988 आणि 1992 मध्ये लोम्बार्डी ट्रॉफी जिंकली आहे. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ असल्याचे बेझोसने अनेकदा सांगितले आहे.

Related Stories

हेलकाव्यांचा काळ

Patil_p

रिलायन्स, ओला, हय़ुंडाईची पीएलआय योजनेकरीता निवड

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार तेजीत

Patil_p

पीएलआय योजनेतून मोबाईल कंपन्यांची 1,300 कोटी गुंतवणूक

Amit Kulkarni

झुकरबर्ग यांची संपत्ती 2महिन्यात वधारली

Patil_p

किरकोळ व्यावसायिक सरकारच्या पाठिशी

Patil_p