एमटीव्ही पुरस्कारांचे झाले वितरण
2022 च्या ‘एमटीव्ह मूव्ही अँड टीव्ही अवॉर्ड्स’मध्ये अभिनेत्री जेनिफर लोपेझला ‘जनरेशन अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱया आणि संशय व्यक्त करणाऱया दोन्ही प्रकारच्या लोकांनी माझ्या यशात योगदान दिले असल्याचे जेनिफरने पुरस्कार मिळाल्यावर बोलताना म्हटले आहे. पुरस्कार सोहळा रविवारी पार पडल आहे. याचे सूत्रसंचालन अभिनेत्री तसेच गायिका वेनेसा हजेंसने केले आहे.
मला आनंद दिलेल्या आणि ज्यांनी माझे मन दुखावले अशा सर्व लोकांचे मी आभार मानू इच्छिते. जे लोक माझ्यासोबत चांगल्या भावनेने जोडले गेले होते आणि जे माझ्याशी खोटं बोलले अशा सर्वांचे मी आभार मानू इच्छित असल्याचे जेनिफरने म्हटले आहे.
लोपेझचा अल्बम ‘मॅरी मी’मधील ‘ऑन माय वे’ या गीताला सर्वोत्कृष्ट गीताच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जेनिफरने यावेळी स्वतःचे कुटुंबीय, मुले आणि चाहत्यांसह स्वतःच्या व्यवस्थापकाचाही उल्लेख केला.
एमटीव्ही मूव्ही अँड टीव्ही अवॉर्ड्समध्ये ‘स्पायडर मॅन-नो वे होम’ला सर्वाधिक 7 शेणींमध्ये नामांकने मिळाली होती. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याचबरोबर अभिनेता टॉम हॉलंडला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.9 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे.
अभिनेत्री जँडेयाला ‘यूफोरिया’ या टीव्ही शोसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॅनियल रेडक्लिफने ‘द लॉस्ट सिटी’साठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार पटकाविला आहे. अभिनेता जॅक ब्लॅकला ‘करियल अचिव्हमेंट’ने गौरविण्यात आले.