ऑनलाईन टिम : पाटणा
झारखंडच्या धनबादमध्ये एक बंद कोळसा खाण कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार समोर येत आहे. घटना घडली तेव्हा पडक्या कोळशाच्या खाणीत बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
झारखंडमधील धनबाद येथील भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) च्या बंद असलेल्या खाण क्षेत्राजवळील 60 फूट ‘कच्चा’ रस्ता गुरुवारी कोसळला. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली. धनबादचे उपायुक्तांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला. उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, कोणीही अडकले नाही किंवा आतापर्यंत कोणीही मृत्यू किंवा जखमी झाल्याची समोर आले नाही.
या वर्षाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला अशीच घटना घडली होती ज्यात बेकायदेशीर कोळसा खाण कोसळून किमान 5 लोकांचा मृत्यू झाला होता. धनबादच्या निरसा ब्लॉकच्या ईसीएल मुग्मा भागात खाणकामाच्या उपकरणाचा तुकडा 20 फूट उंचीवरून पडल्याने ही घटना घडली होती.