Tarun Bharat

मच्छीमारांच्या जाळ्यात ‘जिभोळा’

Advertisements

‘Jibhola’ in fishermen’s nets

मालवण/प्रतिनिधी –

पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस मालवण तालुक्यातील दांडी, वायरी, तारकर्ली आणि देवबाग समुद्रकिनारी ओढल्या जाणाऱ्या रापणीच्या जाळ्यात जिभेप्रमाणे दिसणारे मध्यम आकाराचे लेप मासे सापडून येत आहेत. हे मासे जिभेप्रमाणे दिसतात.

त्यामुळे मालवणातील मच्छीमार त्यांना ‘जिभोळा’ म्हणतात. त्याचे इंग्रजी नाव ‘सोल फिश’ असे आहे. मध्यम आकाराच्या लेप माशांना किलोमागे पंधरा ते सोळा रुपये भाव मिळाला.

रापणीला मिळालेले हे मध्यम आकाराचे लेप मासे मत्स्य प्रक्रिया कारखान्यासाठी खरेदी करण्यात आले. मात्र मोठ्या आकाराच्या लेप माशांना प्रती किलो दीडशे ते दोनशे रुपये इतका भाव मिळत असतो असे मच्छीमारांनी सांगितले.

Related Stories

बुलढाण्यात राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके; सभा बंद पाडण्याचा केला प्रयत्न

Archana Banage

राज ठाकरे यांच्याविरूद्ध अजामीन पात्र वॉरंट जारी

Abhijeet Khandekar

चीनच्या Helo Lite सह अन्य अ‍ॅप्सवरही भारत घालणार बंदी

datta jadhav

संरक्षण सामर्थ्यात भारत चौथ्या स्थानी

Patil_p

पिसाळलेल्या कोह्याचा सातजणांना चावा

Patil_p

बेंगळूरमध्ये कंटेनमेंट झोनची संख्या वाढली

Archana Banage
error: Content is protected !!