ऑनलाईन टीम / मुंबई :
गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना विनयभंग प्रकरणात आसामच्या बारपेटा जिल्हा न्यायालयाने (Barpeta district court bail granted) जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांची 30 एप्रिला सुटका होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ट्विट केल्यामुळे मेवाणी यांना 19 एप्रिलला गुजरातच्या पालनपूर शहरातून त्यांना अटक करण्यात आली होती. आसाम पोलिसांनी अटक करून मेवाणी यांना कोकराझार येथे आणलं होते. ट्विट प्रकरणात मेवानी यांना 25 एप्रिलला जामीन मिळाला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या छेडछाड प्रकरणी मेवाणी यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. त्यानंतर मेवानी यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आसाममधील बारपेटा जिल्हा न्यायालयाने जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर 30 एप्रिलला त्यांची सुटका करण्यात येईल, असं मेवाणी यांचे वकील अंघसुमन बोरा यांनी सांगितलं.