Tarun Bharat

‘जिओ’ची आणखी 50 शहरांमध्ये 5-जी सेवा

17 राज्यांमधील 184 शहरांमध्ये सेवा ः डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात

नवी दिल्ली  

 मागील काही दिवसांपासून देशामध्ये 5-जी सेवा सुरु करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स जिओ, एअरटेल यांच्यात मोठी स्पर्धा सुरु आहे. तसेच अन्य कंपन्या आपली सेवा सादर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सध्या रिलायन्स जिओने आणखीन 50 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरु केली आहे.

यासोबतच  देशातील 17 राज्यांमधील 184 शहरांमध्येही जिओची ही सेवा उपलब्ध होणार आहे. या अगोदर रिलायन्सने मकर संक्रतींच्या दिवशी छत्तीसगडमधील 3 शहरे, राजधानी रायपूर, उद्योग केंद्र दुर्ग आणि भिलाई या ठिकाणी जिओ ट्रू 5 जी सेवा सुरू केली होती. डिसेंबर 2023 पर्यंत भारतातील प्रत्येक शहरात 5जी सेवेचा प्रारंभ करण्याची जिओची योजना आहे.

ग्राहकांना ‘वेलकम ऑफर

5जी सेवा लाँच केल्यानंतर, जिओ ग्राहकांना ‘जिओ वेलकम ऑफर’ची आमंत्रणे देखील मिळणे सुरू होणार आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना अमर्यादित 5जी डाटा आणि 1जीबीपीएस पर्यंतचा वेग मिळेल, ज्यासाठी ग्राहकांना कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही. 

जिओची 5 जी सेवा या शहरांमध्ये सुरु...

?आंध्र प्रदेश ः चित्तूर. कडपाह, नरसरावपेट, ओंगोल, राजमहेंद्रवरम, श्रीकाकुलम,  विजयनगरम

?
हरियाणा ः अंबाला, बहादूरगड, हिस्सार, कर्नाल, पानिपत, रोहतक, सिरसा, सोनीपत

?ओरिसा ः बालासोर, बारीपाडा, भद्रक, झारसुगुडा, पुरी, संबलपूर

?कर्नाटक ः बागलकोट, चिक्कमंगळुरू, हासन, मंडय़ा, तुमकुरू

?महाराष्ट्र ः कोल्हापूर, नांदेड-वाघाळा, सांगली

?छत्तीसगड ः बिलासपूर, कोरबा, राजनांदगाव

?उत्तर प्रदेश ः झाशी, अलीगढ, मुरादाबाद, सहारनपूर

?तामिळनाडू ः धर्मपुरी, इरोड, थुथुकुडी

?राजस्थान ः बिकानेर, कोटा

?पश्चिम बंगाल ः आसनसोल, दुर्गापूर

?पुडुचेरी ः पुडुचेरी

?पंजाब ः अमृतसर

?तेलंगणा ः नलगोंडा

?गोवा ः पणजी

?झारखंड ःधनबाद

?केरळ ः अलप्पुझा

?आसाम ः नागाव

Related Stories

कोल इंडिया सौर प्रकल्पांमध्ये 5,650 कोटी गुंतवणार

Patil_p

विक्रीमधील दबावामुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p

भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगात वेगाने वाढणार

Patil_p

ट्रक्सन टेक्नॉलॉजीच्या आयपीओला 23 टक्के प्रतिसाद

Patil_p

नवीन मोटार इन्शुरन्स ग्राहकांच्या फायद्याचा

Patil_p

23 कोटी ईपीएफओ खातेधारकांना व्याज परतावा

Amit Kulkarni