मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बीपी यांच्यातील संयुक्त कंपनी जियो-बीपी येणाऱया काळात चार्जिंग केंद्रांचा विस्तार करणार आहे. याअंतर्गत ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्राकरीता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांकरीता चार्जिंग केंदे उभारण्याचे काम जियो-बीपी हाती घेणार आहे. मागच्या वर्षी महिंद्राने जियो-बीपीशी सहकार्याचा करार केला असून याअंतर्गत जियो-बीपी चार्जिंगसह इतर सेवा महिंद्राला पुरवणार आहे. सुरुवातीला 16 शहरांमध्ये चार्जिंग पेंद्रे उभारली जातील.