Tarun Bharat

देशातील वातावरण बदलत आहे..राहूल आवाज उठवणारा नेता- संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधून (Jammu & Kashmir) जात असताना काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभाग घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना संपुर्ण भारत “आवाज उठवणारा नेता” म्हणून पाहत आहे.

या यात्रेत प्रसार माध्यमाबरोबर बोलताना ते म्हणाले, “या भारत जोडो यात्रेत मी शिवसेनेच्या वतीने आलो आहे. देशातील वातावरण बदलत असून राहुल गांधींना अन्यायाविरुध्द आवाज उठवणारा नेता म्हणून पाहत आहे. राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ लोक गर्दी करत असून अनेक लोक या यात्रेमध्ये सामील होत आहेत.” असे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

संजय राऊत हे जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्याआधी त्यांनी काश्मिरी पंडितासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) शीख प्रतिनिधींनाही भेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Related Stories

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर रघुनाथदादा पाटील यांची टीका

Archana Banage

कराडला उच्चांकी 100 मिमी पाऊस

Patil_p

स्फोटाचे कारस्थान ‘जैश उल हिंद’चे

Patil_p

युक्रेनमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थी जखमी

datta jadhav

दुचाकीवर लहान मुले असल्यास वेगाचे बंधन

Patil_p

बस दरीत कोसळून उत्तराखंडमध्ये 15 ठार

Patil_p