प्रतिनिधी /बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात आणखी एक इमारतीची उभारणी केली. या इमारतीमध्ये दोन जिल्हा न्यायालये सुरू केली जाणार आहेत. इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.
बेळगाव येथील न्यायालय आवारात 34 हून अधिक न्यायालये आहेत. जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक न्यायालये अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहेत. वकील तसेच पक्षकारांना बसण्यासाठीदेखील योग्य जागा नाही. त्यामुळे जुन्या इमारतीमधील काही न्यायालयांसाठी या इमारती बांधण्यात येत आहेत.
सध्या जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये ही इमारत उभारली आहे. या न्यायालयांमध्ये सध्या दोन न्यायालयांसाठी जागा उपलब्ध आहे. त्यानंतर पहिला मजला बांधून आणखी काही न्यायालये सुरू करण्याचा मानस आहे. सध्या या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच याचे उद्घाटन होणार आहे. मात्र या परिसरात पार्किंगसाठी जागा कमी पडत असल्याने वकिलांतून नाराजी व्यक्त होत आहे.