वार्ताहर /मडकई
जॉन आगियार यांची देवी नवदुर्गेवर रचलेले गीत अत्यंत भक्तीपूर्ण असून भाविकांच्या ते कायम स्मरणात राहील. गायक अक्षय नाईक यांनी या गाण्याला योग्य न्याय दिल्याने त्यातील भाव स्पष्ट होतात, असे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.
मडकई येथील श्री देवी नवदुर्गेच्या प्रागंणात गिताचे अनावरण करताना मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक सी. एल पाटील, गीतकार माहिती खात्याचे निवृत्त अधिकारी जॉन आगियार, गायक अक्षय नाईक, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, मडकईचे पंचसदस्य विशांत नाईक, दुर्गादास नाईक, पूजा गावडे, सुषमा गावडे, वाडी तळावली पंचायतीच्या सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, कवळे पंचायतीच्या सरपंच मनुजा नाईक, आडपई आगापूरच्या सरपंचा क्षिप्रा आडपईकर, कुंडईचे सरपंच सर्वेश कुंडईकर, उद्देश केरकर आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.
जॉन आगीयार हे लहानपणापासून संघर्षमय जीवन जगत आले आहेत. एनसीसी कॅडेटचे ते अधिकारी होते. वेगवेगळय़ा क्षेत्रात त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे, असे पुढे बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले.
जॉन आगीयार यांनी मनोगत व्यक्त केले. सी. एल. पाटील व दामोदर नाईक यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन अक्षय नाईक यांनी तर उद्दिशा केरकर यांनी आभार मानले.