पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डच्या विरोधात निर्णय
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डच्या विरोधातील मानहानी प्रकरणात व्हर्जिनियाच्या एका न्यायालयाने निर्णय दिला आहे. 6 आठवडय़ांपर्यंत चाललेल्या या खटल्यात जॉनी डेपच्या बाजूने निर्णय आला आहे डेपला भरपाईदाखल 15 दशलक्ष डॉलर्स (116 कोटी रुपये) इतकी भरपाई मिळणार आहे. तर हर्डला देखील भरपाईदाखल 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1.55 कोटी रुपये) दिले जाणार आहेत.
अंबर हर्डने डेपच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर अभिनेत्याने अंबर विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अभिनेत्री अंबरने जॉनी डेप विरोधात गैरवर्तन आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. हर्डने न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हणत यामुळे माझे मन तुटल्याचे म्हटले आहे. तर डेपने न्यायालयामुळे मला माझे जीवन परत मिळाल्याचे विधान पेले आहे.
हर्डच्या लेखामुळे बदनामी
व्हर्जिनियात 7 सदस्यीय ज्युरीला हर्डने 1018 मध्ये लैंगिक हिंसेप्रकरणी डेप विरोधात लेख लिहिला असल्याचे आढळून आले. या लेखाद्वरो डेपच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचल्याचे ज्युरींचे मत निर्माण झाले आहे. ज्युरींनी डेप आणि अंबर हर्ड दोघांनाही मानहानीसाठी जबाबदार ठरविले आहे. डेपचे वकील ऍडम वाल्डमॅन यांनी हर्डच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला होता. यामुळे हर्डलाही नुकसान भरपाई मिळावी असे ज्युरींनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे अन्य महिलांनाही झटका बसणार आहे. महिलांच्या विरोधातील हिंसेबद्दलचे गांभीर्य यामुळे कमी होणार असल्याचा दावा हर्डने केला आहे. हर्ड आणि डेप यांनी 2015 मध्ये विवाह केला होता. मे 2016 मध्ये हर्डने डेप विरोधात घरगुती हिंसेचा आरोप केला होता. दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता.