Tarun Bharat

विनापरवाना व्यवसाय-प्लास्टिक बंदीची मनपाकडून संयुक्त कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

 प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत महापालिकेच्यावतीने बुधवारी विविध ठिकाणी कारवाई करून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी व्यवसाय परवान्याची तपासणी करून व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. एकाचवेळी व्यवसाय परवाना तपासणी आणि प्लास्टिक बंदीची कारवाई करण्याची संयुक्त मोहीम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी सुरू केली आहे.

प्लास्टिक बंदी काटेकोरपणे राबविण्याची सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य शासनाने केली आहे. मात्र याचे गांभीर्य महापालिका आणि प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्यावतीने अधूनमधून प्लास्टिक बंदीची कारवाई राबविण्यात येत आहे. मागील आठवडय़ात विविध ठिकाणी प्लास्टिक विरोधी मोहीम राबवून व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली होती. पण बुधवारी सकाळी व्यवसाय परवाना तपासणी आणि प्लास्टिक बंदी कारवाई केली. यावेळी बाजारपेठेतील विविध व्यावसायिकांकडील व्यवसाय परवान्याची तपासणी केली. व्यवसाय परवाना नसलेल्यांना नोटीस बजावून तातडीने व्यवसाय परवाना घेण्याची सूचना केली. 7 दिवसांत परवान्यासाठी अर्ज केला नसल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही व्यावसायिकांना देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे या कारवाईवेळी प्लास्टिकचा वापर केला जातो का? याची चाचपणी करण्यात आली. सिंगलयूज प्लास्टिकचा वापर करणाऱयांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच दंड वसूल करण्यात आला. भातकांडे गल्लीत विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या कारवाईवेळी अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी मनपाचे स्वच्छता निरीक्षक संतोष कुरबेट, किल्लेकर, बसवराज आणि हरेष राठोड आदींसह मनपाचे कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.

Related Stories

पोतदार के.आर शेट्टी किंग्ज, झेवर गॅलरी डायमंड्स संघ विजयी

Amit Kulkarni

कोरे गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

Omkar B

ग्रामपंचायत ग्रंथपालांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे वनमहोत्सव साजरा

Omkar B

जिल्हय़ात 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

रविवारी पावसाने घेतली उसंत

Amit Kulkarni