वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या ऑस्टेलियन महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर आला असून भरात आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील रविवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज जेस जोनासेन स्नायू दुखापतीमुळे खेळू शकली नाही.
या मालिकेसाठी आता उर्वरित सामन्यात जोनासेनच्या जागी अमंदा वेलिंग्टनचा समावेश करण्यात आला असून ती मंगळवारपर्यंत भारतात दाखल होणार आहे. या स्नायू दुखापतीमुळे जोनासेनला उर्वरित मालिकेला मुकावे लागत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडय़ांनी पराभव केला होता.